“शिवसेनेचा खरा आवाज विधान परिषदेत पोहचविण्यासाठी शिवसेनेचे सईद भैय्या खान यांनाच संधी द्या.
शिवसेनेसह पदाधिकारी शिव सेनिक , कार्यकर्त्यांची मागणी
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
———————————
राज्याच्या राजकारणात जमिनीवर व शेवटच्या घटका पर्यंत काम करणाऱ्या, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या नेतृत्वाची आज अत्यंत गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शिव सेनिक अल्पसंख्याक, गरजू आणि वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान हे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी एक सक्षम आणि योग्य पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
सईद खान यांनी गेल्या अनेक वर्षां पासून समाज कार्यात स्वतःला झोकून दिले असून, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक मदतीच्या माध्यमातून हजारो गरजू नागरिकांना थेट आधार दिला आहे.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून लोकांच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
८०% अंशी टक्के समाजकारण व २० % वीस टक्के राजकारण असल्यामूळे त्यांची कार्यशैली ही ‘२४ तास जनतेसाठी उपलब्ध’ अशी ओळख निर्माण करणारी आहे. कोणत्याही नागरिकाचा प्रश्न असो, तात्काळ प्रतिसाद देऊन तो मार्गी लावण्याची त्यांची सवय बनली आहे.
त्यामुळेच ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांचा मजबूत जनसंपर्क तयार झाला आहे.
युवकांच्या प्रश्नांवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रोजगार, शिक्षण आणि सामाजिक मुख्य प्रवाहात युवकांना आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून अनेकांना दिशा दिली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची समन्वयवादी भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद मानली जाते.
पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि भक्कम जनाधार या त्रि-सूत्रावर उभे असलेले सईद खान हे केवळ कार्यकर्ता नसून जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळेच विधान परिषदे सारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती ही शिवसेनिक, सामान्य नागरिक, अल्पसंख्याक आणि दुर्लक्षित घटकांसाठी एक बुलंद आवाज ठरू शकते.
आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडण्याची क्षमता त्यांच्या कार्यातून दिसून येत आहे.
त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने लोकप्रति निधित्व मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेची संधी देणे काळाची गरज असल्याचे मत सर्व सामान्य शिव सेनिक, नागरिक , व सामाजीक कार्यकर्त्या मधून व्यक्त होत आहे.
यामुळे शिवसेनेच्या वतीने अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना विधान परीषदेची ऊमेदवारी देण्याची जोरदार मागणी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वतीने होत आहे .
***

