कौडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस कवळे गुरुजी यांची उपस्थिती.

कौडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस कवळे गुरुजी यांची उपस्थिती.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर 

मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी कौडगाव ता. उमरी जि.नांदेड येथील जयंती दिनी उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल चे विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातील उच्च शिक्षणानंतर भारतात परतून अनेक अडथळ्यांवर मात करत देश उभारणीसाठी अजोड कार्य केले.कवळे गुरुजी पुढे बोलताना म्हंटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमत:आणि अंतिमत:  भारतीयच हे तत्व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. संविधानाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया रचला. मानवी मूल्ये,समान हक्क, समान संधीसाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. अशा महान राष्ट्रनिर्मात्याला कौडगाव येथील जयंतीदिनी अभिवादन केले..!
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कौडगाव गावातील सरपंच,चेअरमन,गावातील प्रतिष्ठित मंडळी युवक मंडळी उपस्थित होते.
Previous Post Next Post