*जय जगन्नाथ सेवानिवृत्त जेष्ठ सदस्यांचा सत्कार... कर्मविर विद्यालयाचा उपक्रम* (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.29: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विवीध कार्यक्रमानिमित्त जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा येथील जेष्ठ व वयोवृध्द सदस्यांचा विशेष सत्कार कर्मवीर विद्यालय गवराळा तर्फे करण्यात आला.याप्रसंगी माजी प्राचार्य मांडवकर सर अध्यक्ष स्थानी तर रमेश महाकुलकर सर, लिमेश माणूसमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडळाच्या जेष्ठ सदस्यांचा वयाचा व कार्याचा परिचय देत भावपुर्ण असा सोहळा पार पडला.सुनिल वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर देहारकर सर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जय जगन्नाथ सेवानिवृत्त जेष्ठ सदस्यांचा सत्कार... कर्मविर विद्यालयाचा उपक्रम*                                      
Previous Post Next Post