निळकंठराव गुंडावार यांची ११७ वी जयंती उत्साहात साजरीसंस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा थाटात शुभारंभ. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.२८:-येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व.निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांची ११७ वी जयंती संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात करुन नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. दि.२० ते २५ जानेवारीपर्यंत चाललेल्या या जयंती महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे माजी वनमंत्री व मूल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, माजी सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, मंडळाचे संचालक गोपाळराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे, प्राचार्य सचिन सरपटवार, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मिसाबंदीत विशेष कार्य केल्याबद्दल बळवंतराव गुंडावार आणि मनोहरराव पारधे यांचा आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत गुंडावार यांचाही आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ऐतिहासिक शिवकालीन नाणी व वस्तुसंग्राहक अमित गुंडावार यांच्या शिवकालीन वस्तूसंग्रह प्रदर्शनीचे आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे आगमन होताच लोकमान्य ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि गौरव गीत सादर केले. सायंकाळी गौरव चौथ्या स्तंभांचा या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भद्रावती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गट शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुलांना एक घर द्या या विषयावर डॉ.बाबा नंदनपवार यांची व्याख्यानमाला पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ.दीपलक्ष्मी भट यांचा कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. तर सायंकाळी डॉ.अमितकुमार लांडगे वर्धा यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संगीत रजनी पार पडला. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजयी खेळाडूंना गौरव चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर विविध स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस, गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी स्नेहभोजनाने जयंती समारोहाची सांगता झाली.समारोहादरम्यान, नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, करण देवतळे आणि अन्य मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व वृक्ष देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
byMEDIA POLICE TIME
-
0