बाळदी येथे अखंड हरिनाम सप्ताह समारोप उत्साहात.. ( अतिश वटाणे तालुका प्रतिनिधी उमरखेड )उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाला ह भ प कान्होपात्रा शिंदे हिंगोली, ह भ प दीनानाथ महाराज इंजनगावकर,ह भ प बबन महाराज खेरडा, ह भ प ज्ञानेश्वर महाराज दिंडे हिंगोली, ह भ प सौ.वैशालीताई पाटील नरसी नामदेव ,सुभाष महाराज ठाकरे खरोळा, ह भ प श्रीराम महाराज कुंटे हिंगोली, ह भ प भीमराव महाराज साठे, व ऑर्गन वादक ह भ प गजानन महाराज पिंपरी इत्यादी कीर्तनकार लाभले होते. दैनंदिन जीवन जगत असताना माणसाने माणुसकी या नात्याने सर्वांसोबत राहिली पाहिजे तरच तुमच्या जगण्याला अर्थ आहे.संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास सांगून गावकऱ्यांना उत्कृष्ट संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे आपले भाग्यच म्हणावे लागेल,आज जे देवळात देव आहे ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे, व्यसनापासून मुक्त रहा अस श्रीराम महाराज कुंटे म्हणाले.सात- आठ दिवस गावामध्ये उत्साही वातावरण होते. आज शेवटच्या दिवसी सकाळी पालखी निघाली होती. या पालखीला गावातील पुरुष महिला व बालगोपाल उपस्थित होते. संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून पूर्ण गाव सजवले होते.त्यानंतर आज सर्व गावकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील तांड्यातील सर्व महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी पुढार्यांनी आठ दिवस जे परिश्रम घेतले त्यांचे आज गावभर कौतुक केले जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0