.शालेय विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षणाची आवश्यकता©)> - बलभीम माथेलेे (मानवत // प्रतिनिधी.-) -------------------------------------------------------शालेय विद्यार्थ्यांना प्राथमिक जीवनापासून विविध अनुभव विद्यालय देत असते त्याबरोबरच शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण द्यावे. असे आव्हान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिक्षण तज्ञ बलभीम माथेले यांनी केले.मानवत तालुक्यातील उपक्रमशील व प्रयोगशील व शालेय शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या सौ.रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक सेमी विद्यालय मानवत.विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन "भारतीय संस्कृती विविधतेतून एकतेची" सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष व वार्षिक स्नेहसंमेलन 2025 ' भारतीय संस्कृती 'कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री विजयकुमार कत्रुवार, प्रमुख उपस्थिती सचिव मा.श्री बालकिशन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक मा.श्री.दिलीपराव हिबारे, मा.श्री. ऋषिकेश लड्डा, विद्यालयाचे प्रशासक तथा शिक्षण सल्लागार मा.श्री प्रवीण बेले, विद्यालय व्हॉलीबॉल मार्गदर्शक मा.श्री.किशोर तूपसागर,मुक्तांगण साधन व्यक्ती मा.श्री आनंद नांदगावकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक श्री विलास शिंदे हे उपस्थित होते.यावेळी बलभीम माथेले यांनी विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षणातून जीवनातील प्रत्येक योग्य गोष्टीचा अनुभव घेऊ दिला पाहिजे त्यामुळेच प्रत्येक समस्येतून अनुभव मिळत कृतीयुक्त जीवन प्रणाली काय असते हे ज्ञात होईल. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली बांधिलकी महत्वाची आहे असे स्पष्ट केले. त्याबरोबरच प्राथमिक शिक्षण प्रभावीपणे राबवून शिक्षण स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केले. विद्यालयामार्फत स्पर्धा परीक्षेच्या काळात शालेय शिक्षणाला,सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत केलेल्या कामगिरी बाबत समाधान व कौतुक व्यक्त केले.मा.श्री बालकिशन चांडक यांनी यावेळी बोलताना सांगितले की,भ्रमणध्वनीचा वापर घातक स्वरूपात निर्माण होत आहे ते टाळून प्रत्यक्ष जीवनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. मानवत तालुक्यामध्ये सेमी विद्यालय निर्माण करून सर्जनशील व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय कै. प्रा.डॉ. ओ.बी समदाणी यांच्या स्वरूपाने पूर्णत्वास जात आहे असे स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आई या कविता संग्रहाचे व माझे आदर्श या हस्तलिखिताचे, व भारतीय संस्कृती या भीतीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. स्त्री सबलीकरण संदर्भात विद्यालयातील विद्यार्थिनी मार्फत कराटे प्रात्यक्षिकातून धाडसी गुण प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण व्हावेत असा संदेश दिला.वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २०२५ भारतीय संस्कृती -विविधतेतून एकतेची या थीमवर आधारित असल्याबाबत विद्यालयाचे कौतुक केले. हा सोहळा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या दोन दिवशी घेण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना मा.श्री. विजयकुमार कत्रुवार यांनी स्पर्धा परीक्षा व शालेय शिक्षणास महत्त्व द्यावे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक विलास शिंदे यांनी तर सूत्रसंचालन श्रीपाद दडके व ज्ञानेश्वर पांचाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले..
byMEDIA POLICE TIME
-
0