३ ब्रास अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पकडले यावल पोलिसांनी.३१ जानेवारी रात्री २ वाजेची घटना. (यावल दि.३१ ( सुरेश पाटील ) अंजाळे शिवारातून ३ ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर यावल पोलिसांनी सिनेमास्टाईल पद्धतीने पकडून यावल पोस्टेला जमा करून डंपर चालक / मालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,अंजाळे गावात अंजाळे ते यावल रोडवर दि.३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी २ वाजेच्या सुमारास स्वतःच्या फायद्यासाठी लवाडीच्या इऱ्याद्याने डंपर क्र.एम.एच.-४०-७१९५ (डंपर मालकाने वाहनावर हा क्र. स्पष्ट नमूद केलेला नाही.) मधे अवैध तीन ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने डंपर चालकाची विचारपूस केली असता डंपर वरील संदीप देविदास भोई वय २१ राहणार फैजपूर तानाजी नामदेव वाघ वय २० राहणार भुसावळ मरी मातेच्या मागे उडवा उडवीचे उत्तर देवून पोलिसांशी हुंज्जत बाजी,दादागिरी करीत कारवाई होऊ नये म्हणून वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अवैध ३ ब्रास वाळू सह डंपर पोलीस स्टेशनला जमा केले. संदीप भोई तानाजी वाघ यांनी संगनमताने त्यांचे ताब्यातील वाहन क्र.एम.एच-४०-७१९५ या डंपर मध्ये शासनाचा महसूल बुडवून स्वतःचे आर्थिक फायद्याचे उद्देशाने अवैध ३ ब्रास वाळू अंदाजे किंमत १६ हजार ५०० रुपयाची लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी वाहनासह (डंपरची किंमत अंदाजे ६ लाख रुपये ) मिळून आला अशी खबर पो.कॉ. अनिल साळुंखे,मुकेश पाटील यांनी दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला गु.र.नं. ६७ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ ( २ ),३ (५ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू,डंपरसह ६ लाख १६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल यावल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ.उमेश महाजन करीत आहे.यावल तालुक्यात अंजाळे, बोरावल,भालशिव,पिप्री, टाकरखेडा,कोळन्हावी,डांभूर्णी, किनगाव,दहिगाव सौखेडा,सातोद वड्री,यावल,डोंगरकठोरा,पाडळसे,भालोद,बामणोद,आमोदे,हिंगोणा,न्हावी,फैजपूर परिसरातून दिवस-रात्री महसूल व पोलिसांची दिशाभूल करीत ९० टक्के अवैध पिवळी माती,अवैध वाळू,मुरूम,खडी इत्यादी गौण खनिज वाहतूक सुरू आहे यात काही शासकीय कर्मचाऱ्यांची दुसऱ्यांच्या नावावर अवैध गौण खनिजाची ४०७, छोटा हत्ती, ट्रॅक्टर, डंपर इत्यादी वाहनातून अवैध गळून खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे यांचे सुद्धा माहिती महसूल व पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अवैध वाळू वाहतूकदारांमधूनच होत आहे. रात्रीच्या वेळेस पोलीस व महसूल पथकाने संयुक्तपणे पेट्रोलिंग,गस्त घालून कारवाई केल्यास किंवा ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासणी केल्यास अनेक अवैध वाळू वाहतूकदारावर कारवाई होऊ शकते अशी सुद्धा तालुक्यात चर्चा सुरू आहे.

३ ब्रास अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पकडले यावल पोलिसांनी.३१ जानेवारी रात्री २ वाजेची घटना.              
Previous Post Next Post