**पोलिस प्रशासनाच्या वतीने नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संवाद मेळावा संपन्न*. (मानवत / प्रतिनिधी.)परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी व मानवत पोलीस स्टेशन मानवतच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिव व उच्चमाध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीशी संवाद मेळावा आज दिनांक 30 जानेवारी रोजी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थिनीशी मेळाव्याच्या अनुषंगाने मुंबई येथील जाणीव संस्था येथील करियर कौन्सिलर मिलिंद पोंगसे करुणा माल समिंदर शालिनी पवार मानवत पोलीस स्टेशनचे शकुंतला चांदीवाले सय्यद फयाज , नेताजी सुभाष विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली *एक संवाद विद्यार्थिनीशी* हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक उद्धवराव हरकळ पाटील, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, विजयाताई डोके, अनिताताई पतंगे , अशोकराव काळे सर गणेशराव सिरसकर, भास्कर झोल पाटील आदी सह अनेक मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. यावेळी उपक्रमा मध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सदाशिवराव होगे पाटील यांनी केले.***
byMEDIA POLICE TIME
-
0