*पाथरी विधान सभा मतदार संघातील प्रलंबीत रेल्वेप्रश्न सोडवा *करणी सेनेची मागणी*. (मानवत // प्रतिनिधी.)पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत पाथरी सोनपेठ या तीन तालूक्यातून परळी रेल्वे मार्गासाठी अनेकांनी २०१९ पासून निवेदने पण मार्ग निघत नसल्याने करणी सेनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरून काही तरी या प्रलंबीत रेल्वे मार्गासाठी करता येते का ? या साठी आज करणी सेनेचे युवा अध्यक्ष राम पंडीतराव दहे पाटील यांनी मानवत तहसिलचे तहसिलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे दूरदृष्टी , विकासाभीमूख मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.निवेदनावर अध्यक्ष राम पंडीतराव दहे, पाटील. यांची स्वक्षरी आहे.सविस्तर वृत्त असे की,मानवतरोड ते परळी प्रलंबीत रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ अमलबजावणी करा अशी मागणी करणी सेनेच्या वतीने विनंतीच्या माध्यमातून करण्यात आली. की,मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गाच्या जमीन संपादित करण्या बाबत मुख्यमंत्र्याचे आदेश असताना राजकीय नेते व जिल्हा प्रशासनाकडून उदासीनता दिसून येत आहे. सन 2016 च्या रेल्वेअर्थ संकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मानवत रोड ते परळी व्हाया पाथरी सोनपेठ या नवीन रेल्वे मार्गाला परवानगी देऊन या मार्गाचे सर्वे करण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक सिकंदराबाद यांच्या वतीने मुख्य अभियंता सर्वे यांनी दिनांक 11/10/2018 रोजी कार्यकारी संचालक/कार्य, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांना या रेल्वे मार्गाचा सर्व्हेचा प्रस्ताव पाठवला. या रेल्वे मार्गासाठी 922 कोटी रुपये खर्च होणार असून या मार्गावर पाच रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे मार्गासाठी २१८ कोटी ३७ लाख रुपये ची जमीन व खर्च दाखवला आहे. या रेल्वे मार्गाच्या मागणी साठी दि.11/2/2016 रोजी बिहारचे माजी राज्यपाल व माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे पाथरी साईबाबांच्या जन्मभूमीच्या दर्शनासाठी आले असता. साई संस्थानचे अध्यक्ष स्व. सितारामजी धानू, परळी रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश सामत, सोनपेठ नगर पालिकेचे माजी प्रभारी अध्यक्ष स्व. बालाप्रसादजी मुंदडा, मानवत तालुका प्रवासी संघटनेचे सचिव के.डी.वर्मा,आ.बाबाजाणी दूर्राणी, यांनी रामनाथजी कोविंद यांना साई भक्तांच्या दर्शनासाठी तसेच मानवत पाथरी सोनपेठ तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मानवतरोड ते परळी व्हाया सोनपेठ परळी या रेल्वे मार्गाच्या मंजुरी साठी रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी सहकार्य करावे याबाबतचे निवेदन देण्यात आले.* *रामनाथजी गोविंद यांनी 19/2/2016 रोजी माजी रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांना या रेल्वे मार्गाबाबत तसेच मानवतरोड रेल्वे स्टेशनला विविध एक्सप्रेसचे थांबे मंजूर करावे म्हणून पत्राद्वारे शिफारस केली. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सन 2016 च्या रेल्वे अर्थसंकल्पात मानवतरोड ते परळी व्हाया सोनपेठ या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन या मार्गाचे सर्वेक्षणकरण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले. या नवीन रेल्वे मार्गाला महाराष्ट्र सरकारची परवानगी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने या रेल्वे मार्गाला अधिवेशनात विषय मांडून प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांना पाठवण्यासाठी साई संस्थांचे अध्यक्ष सितारामजी धानू, परळी रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश सामंत, आ.बाबाजानी, भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ, महाराष्ट्र परभणी जिल्हा कार्यकारिणीचे सहसंयोजक के.डी.वर्मा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाथरी विधान सभा मतदार संघातील विविध संघटना व सूज्ञ नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली. पण प्रश्न काही मार्गी लागला नाही. परळी रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश सामत यांनी दिनांक 29/11/2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांना निवेदन दिले. या निवेदनात मानवत रोड ते परळी वाया सोनपेठ या नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आवश्यक असणारी जमीन संपादित करून रेल्वे बोर्ड अध्यक्ष दिल्ली यांना त्वरित हस्तांतरित करणे बाबत निवेदन दिले.**तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना प्रकाश सामंत यांच्याद्वारे आलेल्या निवेदनावर तात्काळ असा शेरा मारून उपसचिव कुलकर्णी व प्रधान सचिव परिवहन विभाग यांना कळवले. दिनांक 21/12/2018 रोजी राज्याचे महसूल व वन विभागाच्या वतीने कक्ष अधिकारी नि.ग.सोनखासकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र क्रमांक व्हि.आय.पी/2018/प्र.क्र./165/अ-1 या पत्राद्वारे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठवले.* *संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त पुनर्वसन महेंद्र होरपाळकर यांनी दिनांक 6/1/2019 परभणी जिल्हाधिकारी यांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठवले. परभणी जिल्हा भुसंपादन विभागाच्या वतीने दि.15/3/2019 रोजी उपविभागीय अधिकारी पाथरी यांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठवले. उपविभागीय पाथरी यांनी दि.31/5/2019 रोजीच्या पत्रानुसार मानवत, पाथरी, सोनपेठ, तहसीलदारांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठवले.आता 2025 साल उजाडले अजूनही राज्य सरकार व विभागीय प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय माजी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनीही संभाजीनगर येथील बैठकीत या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले. या नवीन रेल्वे मार्गामुळे पाथरी,मानवत, सोनपेठ ,तसेच परळी या चार तालुक्याचा विकास झाला असता. केंद्र व राज्य सरकार सक्षम असून ही पाथरी विधान सभा मतदार संघातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबीतच राहिला असल्यामूळे नागरिकातून संताप व्यक्त केल्या जात आहे. या भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्ना बरोबर विकासाच्या प्रश्नाकडे राज्याचे विकासरत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांनी लक्ष घालून रेल्वेचा प्रलंबीत प्रश्न मार्गीलावून विकास करावा अशी मागणी करणी सेनेच्या वतीने करण्यात येते. रेल्वेचा प्रलंबीत प्रश्न मार्गी न लागल्यास करणी सेनेच्या वतीने पाथरी विधान सभा मतदार संघात आंदोलन करावे लागेल, आंदोलन काळात काही अनूचित प्रकार घडल्यास त्यास आपले भाजपा लोककल्याणकारी प्रशासन जवाबदार राहिल याची खबरदारी घ्यावी अशी विनंती करणी सेनेच्या वतीने राम पंडितराव दहे पाटील. यांनी केली आहे.***
byMEDIA POLICE TIME
-
0