*पालकमंत्री म्हणून जिल्हातील सर्वप्रश्न सोडविण्यास कट्टीबध्द* *@)> पालकमंत्री , मेघना दिदी साकोरे, बोर्डिकर.*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील रामेटाकळी नागरी सत्कार सत्कारणी लावणारा स्तुत्य उपक्रम राबवला जातो तेव्हा सत्कार स्वीकारताना सुद्धा माझ्या जनतेचा अभिमान वाटतो. पालकमंत्री म्हणून जिल्हातील सर्व प्रश्न सोडविण्यास मी कट्टिबध्द असल्याचे आपल्या मनोगतात मा. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे, बोर्डिकर यांनी व्यक्त केले.शेतकरी, महिला व शेतमजूर यांच्यासाठी आरोग्य शिबीर, अनेक विभागांच्या सरकारी योजना एकत्र करणारे शासन आपल्या दारीच्या धर्तीवर अयोजलेले समाधान शिबीर अन या माध्यमातून शेतकरी बांधवांना वाटप केलेले किसान क्रेडिट कार्ड. आज रामेटाकळी येथे परभणी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या या अनोख्या सन्मान सोहळ्यात सहभागी झाले. माझा सत्कार करताना जनतेचे समाधान करण्याची ही कल्पना खऱ्या अर्थाने जनसेवेचा वारसा जपणारी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जनतेला शासनाच्या सर्व योजना अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा विश्वास दिला. आदरणीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकार परभणी जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय लिहिणार हा विश्वास व्यक्त करत सत्काराबद्दल रामेटाकळी ग्रामस्थांचे आभार मानले.यावेळी सुरेश जी भूमरे , भावना ताई नखाते, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, दादा साहेब टेंगसे, डॉ उमेश जी देशमुख, तहसीलदार माचेवाड, रंगनाथजी सोळंके,सुभाष आंबट, शिवजी बोचरे, पप्पू नखाते, विकास मगर, माधव कोल्हे, माऊली दादा यादव, बाबासाहेब कदम आयोजक सतीश राव कदम, इंदर राव कदम, प्रदीप कदम यांच्यासह परिसरातील सरपंच, चेअरमन व पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थीत होते**
byMEDIA POLICE TIME
-
0