कासोदा पोलिसांनी केला 2 लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त.. (एरंडोल तालुका प्रतिनिधी केदारनाथ सोमाणी) तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असल्याची गुप्त बातमी कासोदा पोलिसांना मिळाली होती त्यावरून कासोदा पोलीस हे गेल्या पाच दिवसापासून त्या मार्गावर होते परंतु पहिले चार दिवस त्यांना त्यात अपयश आले व पाचव्या दिवशी२५/०२/२०२५ रोजी पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान त्यांना एम एच् १९ डी वाय २७१७ या पलसर मोटरसायकलीवर गांजा विक्री करणारा एरंडोलकडून कासोदा गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याच्या मोटरसायकलीवर प्लॅस्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून त्याच्या मोटरसायकलीचा पाठलाग करून थांबवली. त्याच्या मोटरसायकल वरील गोणी तपासली असता त्यात खाकी रंगाचे चौकोनी आकाराचे पुडे मिळून आले. ते फोडून तपासले असता त्यामध्ये गांजा मिळून आल्याने आरोपी यास पोलीस स्टेशनला आणले.  सदर पथकाने संशयित इसम अजय रवींद्र पवार वय २७ वर्ष राहणार सोनबर्डी तालुका एरंडोल याला ताब्यात घेऊन त्याचे कडून १९ किलो गांजा एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा व मोटरसायकल नव्वद हजार रुपये किमतीची असा एकूण दोन लाख ऐशी हजार रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कासोदा पोलिसांनी केला 2 लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त..                                                                              
Previous Post Next Post