.**पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश दादा विटेकर यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून मुरलीधर ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार.*. (मानवत // प्रतिनिधी.)————————————दिनांक १ फेब्रुवारी शनिवार रोजी पाथरी विधानसभा मतदार संघाचे विकास पूरूष लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर, मानवत नगरीचे शिल्पकार श्री डॉ. अंकुशराव लाड, मानवत कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे , मानवत तालूका वकील संघाचे अध्यक्ष अनिरुद्धजी पांडे नगरसेवक दत्ताभाऊ चौधरी, यांनी आज राष्ट्रिय चर्मकार महा संघाचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी भेट दिली या वेळी आमदार राजेश दादा विटेकर व डॉ. अंकुशराव लाड यांनी श्री संत गुरु रविदास महाराज सभागृहा सूरू असलेल्या बांध कामा विषयी समाधान व्यक्त केले. तसेच चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. २३ फेब्रूवारी गुरु रविदास महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करावी असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले, यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ मानवत , जिल्हाध्यक्ष मूरलीधर ठोंबरे यांनी व चर्मकार संघटना परिवाराच्या वतीने आमदार राजेश दादा विटेकर, आणि डॉ. अकूंशराव लाड यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले...
byMEDIA POLICE TIME
-
0