बांबरुड राणिचे येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कार जाहीर.... पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी नोकरी च्या मागे लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने नेहमीच विविध प्रयोग करून त्यांनी पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. कला शाखेतील पदवी व डी. एड शिक्षण असलेल्या या युवकांना शेतीत राबविलेले अनेक प्रयोग यशस्वी करून दाखवले आहे. शेती मध्ये खरीप हंगामात कापुस पिकात अंतर पीक मुग, उडीत, घेतो,भाजीपाला वर्गात मिरची व कारले पीक घेतो व कारले संपल्यावर चवळी व वाल आणि नंतर गिलके हे पीक घेतो. खरीप हंगामात तुर पिकात अंतर पिक मक्का घेऊन विक्रमी उत्पन्न घेतले आहे. रब्बी हंगामात मक्का,दादर,बाजरी,सुर्यफुल,ज्वारी, इ.पीके घेतात. संपुर्ण वर्षात केळी पीक घेतो.केळी पिकामध्ये पत्ता कोबी चा प्रयोग केला होता.सध्दा केळी पिकात मुग व चवळी चा प्रयोग केला आहे.शेती साठी जोड धंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय करतो. शेती विषयी शेतकरी वर्गामध्ये असलेला गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न करणे.उदा.शेतकरी शेती पारपांरीक पध्दतीने न करता व्यावसायिक स्वरूपाने करणे.शेती चे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे..शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येईल यासाठी प्रयत्न करत आहे.शेती साठी मनुष्यबळ कमी कशा पध्दतीने लागेल याठी उपाययोजना करत आहे.शेतीसाठी लागणारे रासायनिक खताचा वापर कमी कसा होईल व शेद्रीय शेती कडे कसे वळता येईल याठी किरण अशोक सुर्यवंशी प्रयत्नशील आहेत. किरण अशोक सुर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी सेवक साप्ताहिका तर्फे त्यांना दि. २ फेब्रुवारी रोजी आदर्श युवा शेतकरी कृषी सेवक पुरस्काराने मा.आमदार श्री. अरुण दादा पाटील यांच्या हस्ते रावेर येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मा. आमदार श्री अरुण दादा पाटील, मा. प्रदिप कोठावळे, मा. श्री. डॉ. के. बी. पाटील, मा. श्री अनिल भोकरे, मा. श्री. डॉ. प्रशांत सरोदे, मा. श्री अमित भारंबे,श्री.पद्माकर महाजन, श्री हरीश गगवाणी, सौ. रंजना पाटील, सौ, भारती गगवाणी, व कृषी सेवक साप्ताहिकाचे संपादक कृष्णा पाटील सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

बांबरुड राणिचे येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कार जाहीर....                         
Previous Post Next Post