यावल महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शन. (यावल दि.६ ( सुरेश पाटील )जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळे अंतर्गत प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी विद्यार्थिनींना सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन करताना सांगितले की सायबर क्राईम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू संगणक,मोबाईल वरील गुन्हेगारी संदर्भात झालेली फसवणूक हे आज भोळ्या भाबड्या व मायाळू उच्चशिक्षित असले तरी अनभिज्ञ व्यक्तींची मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे.त्यामुळे त्यापासून सावधानता बाळगले पाहिजे त्यामध्ये बँकेचे पैशांचे व्यवहार क्रेडिट कार्ड, (पैसे जमा होणे ) डेबिट कार्ड ( पैसे कट होणे ) फोन पे, google पे हे व्यवहार सध्या ऑनलाईन होत असल्याने पैसे किती जातात आणि किती येतात याचा अंदाज येत नाही अनोळखी व्यक्तींकडून बँकेच्या नावाने येणारे फोन,मोबाईलवर येणारे संदेश,याची योग्य वेळी शहानिशा करूनच व्यवहार केला पाहिजे तसेच पिसिंग अकाउंट सोशल मीडियावर आहे त्याचा वापर करावा,व्हाट्सअप,टेलिग्राम, इंस्टाग्राम,फेसबुक मार्फत संदेशवहनाची सुविधा आहे.अशा ठिकाणी सुसाईड मेसेज तसेच भारतीय न्यायसहिता भारतीय नागरिक सुविधा व पंचनाम्याचे ठाकूर यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की सायबर क्राईम हा विषय गुन्हेगारी संदर्भात असला तरी त्यासाठी तो दैनंदिन जीवन जगत असताना सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.सध्या सर्वच ठिकाणी पैशाचे व्यवहार खरेदी विक्री ऑनलाइन स्वरूपात क्यू आर कोड मार्फत हे होत आहेत त्यामुळे क्यू आर कोडची शहानिशा करावी अनोळखी व्यक्तींचे फोन खात्री करूनच स्वीकारले पाहिजे सध्या उच्चशिक्षित लोक जास्त प्रमाणात सायबर क्राईम मध्ये सापडतात त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी यावल पोलीस स्टेशनला क्षेत्रीय भेट दिली त्यात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना बंदूक,पीस्टल, कारबाइन एअर रायफल या संदर्भात माहिती देऊन वेगवेगळ्या विभागातील सखोल माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे,डॉ. निर्मला पवार,डॉ.वैशाली कोष्टी तासिका तत्त्वावरील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे,मनोज कंडारे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0