निपाणी टाकळी उपजिल्हा रुग्णालय मार्ग सेलू रस्ता कधी पूर्ण होणार? (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)अनेक गावाशी जोडणारा महत्वपूर्ण रस्ता असल्याने दुरुस्त करण्याचीगावकऱ्यांची मागणी.सेलू : निपाणी टाकळी ते सेलू ३ किमीनिपाणी टाकळी ते सेलू ८ किमी या दोन्ही मार्गात ५ किमी चा फरक पडला आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून अतिशय खराब अवस्थेत असल्याने अनेक गावातील लोकांना नाहक ३ किमी असलेला मार्ग अधिक सुकर असताना नाईलाजाने ८ किमी असलेल्या मार्गाने प्रवास करावा लागतो.महत्वाचं म्हणजे ३ किमी असलेल्या मार्गावर निपाणी टाकळी पासून अनेक गावे जोडली जातात करडगाव, गोगलगाव, आंबेगाव त्याच बरोबर शासकीय उपजिल्हा रुग्णालय,सेलू असून गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी सेलू शहराला वळसा घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत परभणी गाठायला विनाकारण ८ किमी असलेल्या मार्गाने जावे लागते यात अनेकदा रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.३ किमी असलेल्या मार्गाचे निम्मे काम पूर्ण झाले असून केवळ १.५ किमी मार्गाचे काम शिल्लक आहे.या रोडला अच्छे दिन कब आयेगें? अनेकदा निवेदन,उपोषण करण्यात आले असून आत्ता पर्यंत नुसते कोरडे आश्वासन दिले गेले आहेत. मा.ना. मेघना बोर्डीकर यांना मागच्या वर्षी पत्रकार या नात्याने स्वतः मी निवेदन दिले होते. त्यांनी हा रोड लवकरात लवकर सुरु करू असे आश्वासन दिले होते.परंतु पुढे काय झाले,कुठे माशी शिंकली ते कळाले नाही? अद्याप पर्यंत दुरुस्तीला मोहर्त सापडले नाही. गंभीर रुग्णाचे प्राण आणि सामान्य प्रवाशांचे हाल थांबवायचे असतील तर यावर्षी हा मार्ग पूर्ण करून प्रशासन लावलेल्या रंगीत पाटी प्रमाणे मार्ग चकाचक करेल हि माफक अपेक्षा !!या रोड बाबत आपल्या अपेक्षा, सूचना,व्यथा मांडाव्यात व प्रश्न सोडवावेत हिच अपेक्षा.
byMEDIA POLICE TIME
-
0