लोकमान्य विद्यालयात स्व.बळवंतराव ताठे स्मृती कक्षाचे उद्घाटनतैलचित्राचेही झाले अनावरण.. महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.५:-येथील लोकमान्य विद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा वैदीक गणित तज्ज्ञ स्व.बळवंतराव ताठे यांच्या नावाने असलेल्या स्मृती कक्षाचे उद्घाटन व त्यांच्या तैलचित्राचे अनावरण चंद्रपूर येथील दंत चिकित्सक डॉ.श्याम गुंडावार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.श्याम गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार,शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य उमाकांत गुंडावार, गोपाळराव ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार,संजय पारधे, विजया ताठे, विलास ताठे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी प्रभृती मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व स्व.बळवंतराव ताठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा.स्वाती गुंडावार आणि संच यांनी शारदा स्तवन सादर केले. त्यानंतर विजयाताई ताठे यांचा साडी-चोळी,शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.श्याम गुंडावार यांचाही यावेळी शाल, श्रीफळ आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.श्याम गुंडावार यांच्या हस्ते फीत कापून स्व.बळवंतराव ताठे स्मृती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच या कक्षात ताठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत गुंडावार, अमित गुंडावार, प्रकाश पाम्पट्टीवार, शरद लांबे, अजय पाटील, दिलीप पारखी यांनी स्व.बळवंतराव ताठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ताठे यांचे नातू कार्तिक आणि केतन यांचाही चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य सचिन सरपटवार यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. शिक्षक प्रतीक नारळे यांनी हरीश गुंडावार यांनी ताठे यांच्याबाबत पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रुपचंद धारणे यांनी केले.संचालन प्रा.किशोर किरमिरे यांनी केले.तर आभार शिक्षक आशुतोष सुरावार यांनी मानले.प्रा.स्वाती गुंडावार, प्रतीक्षा खुजे, मिनाक्षी वासाडे, भारती येरेवार, प्राजक्ता चिखलीकर यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता सरोज हिरडे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0