श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर येथे जागतिक महिला दिन साजरा. (रावेर सानिया तडवी आज दिनांक ८ मार्च २०२५ रोजी श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉ. अनिल पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथील प्रसिद्ध डॉक्टर असलेले डॉ. चंद्रकांत पाटील हे होते, त्यांच्या हस्ते आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागतिक महिला दिन या कार्यक्रमासाठी माननीय विजय शांताराम महाजन व प्रा. डॉ. प्रतीक नाईक यांनी विशेष उपस्थिती दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एस. यू. पाटील, प्रा. एस. डी. धापसे, प्रा. डॉ. ए. एन. सोनार, डॉ. एस. जी. चिंचोरे, डॉ. व्ही. बी. सूर्यवंशी, प्रा. एस. बी. धनले, प्रा. डॉ. बी. जी. मुख्यदल, प्रा. डॉ. यू. एन. पाटील, प्रा. एस. डी. महाजन, प्रा. डॉ. एन. बी. जाधव आदी प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आर. एस. पाटील, जयेश बढे, रीतिक गाढे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
byMEDIA POLICE TIME
-
0