यावल-किनगाव रस्त्यावर अपघात... पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर अपघात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

(रविंद्र आढाळे विशेष जिल्हा प्रतिनिधी)

यावल येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अत्यंत मनमिळावू कर्मचारी भरत विठ्ठल कोळी (वय ३८) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावल-किनगाव रस्त्यावरील हॉटेल मनमंदिराजवळ एका भरधाव क्रूझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोळी यांची सोमवारी जळगाव येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री भरत कोळी हे आपल्या दुचाकीने क्र. MH.19.CG.2813 यावल येथून किनगावमार्गे आपल्या राहत्या गावी विदगाव येथे जात होते. हॉटेल मनमंदिराजवळून जात असताना मागून आलेल्या भरधाव क्रूझरने क्र. MH.29.BC.5487 त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
Previous Post Next Post