यावल कडे येणाऱ्या क्रुझर ने दुचाकीला किनगाव हॉटेल मनमंदीर जवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यावल पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी भरत विठ्ठल कोळी गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
यावल शहर प्रतिनिधी आरिफ खान
यावल तालुक्यातील किनगाव येथून यावल कडे येणाऱ्या क्रुझरने दुचाकी ला हॉटल मन मंदीर जवळ समोरा समोर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यात यावल पोलीस ठाण्यातील 38 वर्षीय भरत विठ्ठल कोळी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले त्या पोलीस कर्मचाऱ्यावर जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दिनांक 20/ 4/ 2026 सोमवार रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान निधन झाले त्यांची अंत्ययात्रा त्यांचे मूळ गावी विदगाव तालुका यावल येथे राहत्या घरापासून सकाळी सव्वा अकरा वाजता निघणार आहे..

