*रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न..**शेख शरीफ यांची रावेर तालुका सरचिटणीस पदी निवड त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार*. (जळगाव जिल्हा संपादक) रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न.. रविवार रोजी रावेर येथील शासकीय विश्रामगृहात उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई) व तालुकाध्यक्ष विजय शामराव अवसरमल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली..पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी परिसरातील पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या म.राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वासाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असे यावेळी रावेर तालुका अध्यक्ष विजय शामराव अवसरमल यांनी सांगितले नुतन कार्यकारिणीत रावेर तालुका व रावेर शहरात काही पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली तालुका अध्यक्ष विजय अवसरमल यांनी त्यांना नियुक्ती पत्र व फुल गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रमुख उपस्थिती अनिल आसेकर, शे.मुनाफ , विनायक जहुरे, हमीद तडवी,चंद्रकांत वैदकर, कांतीलाल गाढे, सादिक पिंजारी, दिनेश सैमिरे,प्रशांत गाढे, उमेश तायडे, सुनील महाजन, शेख हमीद, ईश्वर महाजन, राहत खाटीक, शेख.शरीफ, विजय के.अवसरमल, जितू इंगळे, जाकीर तडवी,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.सदर प्रास्ताविक विनायक जहुरे यांनी तर आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.

रावेर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार  संघाची सभा उत्साहात संपन्न..**शेख शरीफ यांची रावेर तालुका सरचिटणीस पदी निवड त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार*.                                                                      
Previous Post Next Post