*तालुका अभियान *व्यवस्थापन कक्ष, उमेद अभियान, पातूर अंतर्गत एकल महिला विशेष कार्यशाळा संपन्न*

*तालुका अभियान *व्यवस्थापन कक्ष, उमेद अभियान, पातूर अंतर्गत एकल महिला विशेष कार्यशाळा संपन्न* 


(पातुर प्रतिनिधी तालुका दुल्हे खान)

 अभियान व्यवस्थापक कक्ष पातुर अंतर्गत सस्ती येथे "एकल महिला कार्यशाळा" यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, अविवाहित महिला सक्षमीकरणासाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महिलांना सामाजिक आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या स्वालंबी बनवणे या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. 
 कार्यशाळेमध्ये ऍडव्होकेट रुपाली राऊत यांनी उमेद अभियानांतर्गत एकल महिलांसाठी उपलब्ध विविध योजना, उपजीविका संधी, स्वयंसहाय्यता गटांद्वारे आर्थिक सक्षमीकरण तसेच शासनाच्या विविध योजना एकल महिला हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी  उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मोहम्मद जाकीर   व दुले खान युसुफ खान यांनी बालसंगोपन योजना, संजय गांधी योजना याबद्दल  एकल महिला परितक्त्या घटस्फोटीत, महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर सीता मॅडम यांनी उमेद अभियानाचे उद्दिष्टे महिलांच्या यशोगाथा याबद्दल मार्गदर्शन केले
यावेळी तालुका व्यवस्थापक Bm- ibcb श्रीमती सरला नाईक यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्रभाग समन्वयक श्रीमती सीता खळे , शेख रिजवान ,शेख  शारुख , संतोष ढगे  विजय खराटे  तसेच मोठ्या संख्येने एकल महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेत सहभागी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर चर्चा केली.
Previous Post Next Post