फैजपुर न पा संचलित दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी याची निविदा काढून कायमस्वरूपी नेमणूक व्हावी त्यासाठी उपोषणाचा दुसरा दिवस. ( फैजपूर प्रतिनिधी ) फैजपूर नपा संचलित दवाखान्यात गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होत नसून त्यासाठी माजी नगरसेवक प्रभाकर पुंडलिक सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्याप पर्यंत नगर पालिकेने त्यांना गेल्या 9 ४ २५ रोजी त्यांना पत्र दिले होते की आम्ही एक महिन्याच्या आत निविदा काढून आणि भरती प्रक्रिया पूर्ण करू परंतु एक महिन्याच्या वर कालावधी उलटला तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाने याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याची कोणतीही निविदा न काढता भरतीची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न केल्याने माजी नगरसेवक प्रभाकर पुंडलिक सपकाळे यांनी या कालावधीत नगरपालिका प्रशासनाला अनेक वेळा विचारणा केली असता त्यांना उडवली चे उत्तर देण्यात आली माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांचा नगरपालिका प्रशासनाने विश्वासघात केल्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उपोषणाची वेळ आली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे जन सामान्य नागरिकांना परिसरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागते त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे याची दखल घेऊन माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे हे उपोषणाला बसले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला यावल तालुका अध्यक्ष पूजाताई पाटील भुसावळ पुनम तालेरे शिवसेना शहर प्रमुख पिंटू मांडवाले युवा शहर युवा शहर प्रमुख कैलास भोई तालुकाप्रमुख राजू काठोके जिल्हा संघटक नितीन सोनार वैशाली पाटील पूजाताई कोलते फैजपुर चे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ रुपेश कोळी सतीश संधान शिव कपिल सिंधी महिला महिला सुरक्षा अध्यक्ष वैशाली बडे विनोद कपले आदी मान्यवरांनी भेटी दिल्या
byMEDIA POLICE TIME
-
0