*१२३ मधील दुकाने अतिक्रमित व्यवसायिकांना मिळण्यासाठी पालिकेवर मोर्चा*. *अमळनेर : भूखंड १२३ अ व ब मधील दुकाने अतिक्रमित अमळनेर व्यवसायिक संघटनेलाच द्यावीत या मागणीसाठी अतिक्रमित दुकानधारकांनी प्रा अशोक पवार यांच्या नेतृत्वखाली पालिकेवर मोर्चा काढला.* भागवत रोड ,टिळक रोड , शिवाजी रोड ,आठवडे बाजार येथील अतिक्रमित दुकानदार २७ वर्षणापासून व्यवसाय करीत आहेत. १९९९ पासून दुकानदारांचा संघर्ष सुरू आहे. १९९९ मध्ये पालिकेने जाहिरातीत अतिक्रमित दुकानदाराना १२३ मध्ये गाळे दिले जातील. त्यावेळी १२० टपरीधारकांनी दहा हजाराचा पहिला हप्ता भरला होता. २००६ मध्ये देखील पालिकेने अतिक्रमण धारकांना समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून अमळनेर व्यवसायिक संघटनांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा बसस्थानक पासून भाजी मार्केट मार्गे पालिकेवर नेण्यात आला. पालिकेत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर याना निवेदन सादर केले त्यात दुकांनाचा विनिमय संघटनेच्या सभासदांमध्येच व्हावा , नपा जागेत दुकान मिळेपर्यंत त्याचजागेवर व्यवसाय करू द्यावा , दुकान संदर्भात निर्णय घेताना संघटनेला विश्वासात घ्यावे , संघटना सकारात्मक चर्चेला तयार आहे. आदी मुद्यांचा समावेश होता. यावेळी सचिव पदमेश सोनवणे , अरुण भावसार , आनन्द सुरळकर , अनिल चोरडिया , भटू जगताप , पी जी टेलर , भरत बडगुजर , किशोर बारी , गोपाळ परदेशी , यांच्यासह १५० व्यवसायिक हजर होते. दरम्यान अतिक्रमित धारकांना दुकान देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कायद्यात तशी तरतूद नसल्याने पालिका याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न मंत्रालय पातळीवर सुटू शकतो असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले.

*१२३ मधील दुकाने अतिक्रमित व्यवसायिकांना मिळण्यासाठी पालिकेवर मोर्चा*.                                             
Previous Post Next Post