भोकरी येथे १० वी १२ वी च्या विद्यार्थीना पेढे व प्रमाण पत्र वाटप .. (रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख)रावेर तालुव्यातील भोकरी येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर संविधान आर्मी रावेर तालुका अध्यक्ष तथा रावेर लोकसभा जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा फाउंडेशन अध्यक्ष माननीय अशोक भाऊ अटकाळे यांचे अध्यक्ष खाली इयत्ता दहावी व बारावी चे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ अटकळे यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणित करून प्रमाणपत्र व खाऊ पेढे देऊन अभिनंदन केले, या प्रसंगी सरपंच सौ सरपंच रूपाली चौधरी, पोलीस पाटील ग्रामसेवक,अधिवासी सेल चे हनिफ तडवी,अमीन तडवी, रामकृष्ण लाहासे,प्रमोद लाहासे,उमेश अटकळे,अतुल अटकळे,व संविधान आर्मी कार्यकर्ते तसेच ग्रामस्था मोठया संख्याने उपस्थित होते,
byMEDIA POLICE TIME
-
0