☆☆बीड शहर बचाव मंच कडून महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी... बीड (प्रतिनिधी) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी बीड शहर बचाव मंच ने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी केली. कब्रस्तानची झालेली दुर्दशा पाहून मंच चे पदाधिकारी आणि सदस्यांनी संवेदनशीतलता व्यक्त करत कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधण्यासाठी तसेच कब्रस्तान मध्ये आवश्यक असलेल्या इतर सोयी सुविधा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊ असे म्हटले आहे. यावेळी बीड शहर बचाव मंच च्या वतीने नितीन जायभाये, डी.जी. तांदळे सर व नितीन वाघमारे यांनी भूमिका स्पष्ट केली. गेल्या दहा वर्षांपासून बऱ्याच वेळेस लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधीं दिलेले आश्वासन पाळत नाहीत, समाजाच्या अडचणी समजून घेण्याची कसलीही त्यांची मानसिकता दिसत नाही. कशाही - कसल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाहीत, निवडणुकांनंतर तोंड ही दाखवत नाहीत. काम करणं दुरच राहीलं, साधा फोन ही उचलत नाहीत. अशी यावेळी उपस्स्थितांच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. कब्रस्तानची पाहणी केल्यानंतर व ऐतिहासिकता जाणून घेतल्यानंतर नितीन जायभाये यांनी या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे पुनर्निर्माण करण्यात येईल,असे ठामपणे आश्वासन दिले आहे. बीड नगर पालिकेची नवीन असेंबली किंवा सभागृह अस्तित्वात येताच तात्काळ ही कामे करून दिल्या जातील. तसेच महेदवीया कब्रस्तानच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या जातील. असेही वचन दिले आहे. यावेळी महेदवीया समाजाचे प्रतिनिधी तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी महेदवीया दायरा कब्रस्तान विषयी पुर्ण माहिती दिली. यावेळी बीड शहर बचाव मंचचे नितीन जायभाये, ज्येष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य डी.जी. तांदळेसर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, रमेशराव गंगाधरे,ॲड. नितीन वाघमारे, रामधन जमाले, सुधीरभाऊ देशमुख,पेठ बीड विभागातील भुषणजी पवार, आपतक यूट्यूब चॅनल चे संपादक इमरोज भाई, शेख फारुख, शेख वसीफ, शेख नसीर, शेख हनीफ, शेख लईख आदींची उपस्थिती होती.

बीड शहर बचाव मंच कडून महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी...                                                                   
Previous Post Next Post