सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस,बांधकाम निधी द्या विश्वनाथ पाटील समन व शंकर महाजन यांची मागणी. मारोती एडकेवार प्रतिनिधी/ नांदेड नांदेड : सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारती पूर्णपणे मोडकळीस आली,असून रुग्ण व आरोग्य अधिकारी यांच्या जीवित्तास धोका आहे. यामुळे सगरोळी आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीस बांधकाम निधी द्या असे,सगरोळी येथील परिवर्तन समितीचे विश्वनाथ पाटील समन व शंकर महाजन यांच्याकडून मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मेघना कावली यांच्याकडे मागणी केली आहे.सगरोळी हे गाव नांदेड जिल्ह्यामध्ये व बिलोली तालुक्यात सर्वात मोठा गाव आहे, या गावची लोकसंख्या 14000 असून मतदार संख्या 5500 आहे,व सगरोळी मोठे बाजारपेठ, व शैक्षणिक संस्था असल्यामुळे. आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिक,हे आरोग्य उपकेंद्रास उपचार करण्यासाठी येत असतात.रुग्णांच्या व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. सगरोळी आरोग्य उपकेंद्र हे 2022 पासून मोडकळीस आले, असून जिल्हा परिषद विभागाचे अभियंता यांनी इमारत बाबत चौकशी केली असता,ती इमारत वापरण्यायोग्य नाही असा अहवाल त्यांनी, मुखाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला. आरोग्य तालुका अधिकारी यांनी प्रशासनाकडे अनेक, वेळेस इमारत मोडकळीस आल्याचे दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली.पण याकडे प्रशासन लक्षात देत नसल्याची मोठी खंत आहे.आरोग्य केंद्राची एवढी बिकट परिस्थिती झाली असून,इमारतीचे काही भाग तेथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर सुद्धा पडले आहेत. त्यामुळे काही लोकांना दुखापत झाली आहे, आरोग्य उपकेंद्राच्या अधिकारी मोकळ्या जागेत बसून रुग्णाची तपासणी करत आहेत, यामुळे लवकरात लवकर सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस, बांधकाम निधी द्या असे परिवर्तन समिती सगरोळी विश्वनाथ पाटील समन व शंकर महाजन यांच्याकडून मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे, सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस बांधकाम निधी द्या अशी मागणी करण्यात आली.

सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस,बांधकाम निधी द्या विश्वनाथ पाटील समन व शंकर महाजन यांची मागणी.                                                    
Previous Post Next Post