*भाजप आमदार करण देवतळे यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात संपन्न*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.९:- चंद्रपूर: वरोरा विधानसभेचे तरुण आणि उदयोन्मुख आमदार करण देवतळेयांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने व भव्य समर्थकांचा उपस्थितीत भद्रावती तालुक्यात साजरा करण्यात आला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध भागातून वरोरा-भद्रावती मतदारसंघातील शेकडो समर्थक भेटीला आले होते. या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी खूप मोठी पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व कमल स्पोर्टिग क्लबचे प्रमुख रघुवीर अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौक, भद्रावती परिसरात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. काही महिन्यांतच मतदारांच्या हृदयाशी आपण नाते जोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या आमदार करण देवतळे यांनी सकाळी ११ वाजल्यापासून आपल्या समर्थकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि संध्याकाळी भर पावसातही गांधी चौक परिसरात जनता, दुकानदार आणि समर्थक यांच्यासमवेत केक कापून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला भाजपा माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, भाजपा सूनिल नामोजवार माजी नगराध्यक्ष, रुपचंद धारणे, अण्णाजी खुटेमाटे, हरीष भाई दुर्योधन, सर निशांत देवगडे, सतीश कांबळे सर, प्रकाश माकोडे, रूपेश मांढरे , योगेश वाडके, सुरज पेंदाम, अनंता आंबीलकर, चेतन गुंडावार, अनंता महाराज, महेश निमसटकर, शैलश नागपूरे, शाम चटपल्लीवार, सुनिल दैदावार, कविता सुलभेवार, मंदे ताई , बोबडे ताई विविध पंचायत सरपंच, नगरपालिका नगरसेवक, माजी सरपंच, जिल्हा पंचायत सभासद, महिला मंडळ आणि स्वयंसेवा संघटनांचे कार्यकर्ते विशेष उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनी आमदार देवतळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. आमदार देवतळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि जनतेशी असलेल्या चांगल्या संबंधांना अजून बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या विकासकार्यामुळे वरोरा-भद्रावती मतदारसंघात सकारात्मक बदल दिसायला लागले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना अभिमानाने 'आपला लाडका नेता' म्हणून सत्कार केला. हे आयोजन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भरपूर उत्साहात पार पडले. वरोरा विधानसभेतील प्रत्येक भागातून मोठ्या संख्येने वडीलधाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे या वाढदिवसाला राजकीय तसेच सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे.

*भाजप आमदार करण देवतळे यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात संपन्न*.                                                    
Previous Post Next Post