''विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ''जळगाव येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी .. .शाळेतील सर्व विद्यार्थी सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी पेहरावात शाळेत आले होते. त्यानंतर खेडी गावात दिंडी काढण्यात आली.आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री भंगाळे व उपशिक्षक जावेद तडवी,गणेश लोडते यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी चे महत्व पटवून दिले.त्यानंतर पालक -शिक्षक संघांचे उपाध्यक्ष शांताराम महाजन यांच्या हस्ते विठ्ठल -रुखमाई यांचा फोटो प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूषण जोगी,पुनम चौधरी,शिल्पा झोपे,सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0