बिलोली येथे नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक तिडके साहेब,यांचा हिप्परगा थडी येथे सत्कार करण्यात आला. (मारोती एडकेवार प्रतिनिधी /नांदेड )नांदेड : बिलोली तालुक्यातील नव्याने रुजू झालेली उपनिरीक्षक तिडके साहेब, यांचा हिप्पारगा थडी येथे सत्कार करण्यात आला. सरपंच इनामदार रहेबर यांच्या निवासस्थानी व तसेच सगरोळी सर्कल बीट जमादार कमलाकर साहेब,व शेख साहेब व उपस्थित होमगार्ड यांचा. सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित हिप्पारगा थडी,गावचे पोलीस पाटील शंकर आप्पा मठपती, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, तंटामुक्ती अध्यक्ष शेषेराव मामडे, हिप्परगा थडीचे सरपंच इनामदार रहेबर, व ग्रामपंचायत सदस्य सय्यद यज्यास,व्यंकट तुकडे व मठपती अशोक महाराज, सय्यद इरफान, इम्रान पटेल, साहेबराव येडकेवार, व पोलीस टाईम्स नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारुती एडकेवार, यांची उपस्थिती होती. गावातील वातावरण हा खूप चांगल्या प्रकारे असल्याचे मनोगत, मान्य उपनिरीक्षक तिडके साहेब यांनी व्यक्त केले. व तसेच कमलाकर साहेब,व शेख सर बीट जमादार सगरोळी सर्कल, यांनी हिप्पारगा थडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, व सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. नव्याने रुजू झालेले तिडके साहेब, व कमलाकर साहेब व शेख साहेब, यांचा हिप्परगा थडी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे सत्कार करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0