हिप्परगा थडी येथे मोहरम उत्साहात साजरा, हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक. (मारोती एडकेवार प्रतिनिधी:नांदेड सगरोळी) : हिप्परगा थडी येथे दरवर्षीप्रमाणे, आली अब्बास आली, यांचा मोहरम सन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो, याही वर्षी मोठ्या उत्साहात मोहरम सण हा साजरा करण्यात आला. यात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक निर्माण झाले.छोट्याशा खेड्यामध्ये सर्व हिंदू व मुस्लिम सर्व बांधवांनी मिळून आली आबास आली,यांचा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागातील श्रद्धा असलेले भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. हिप्परगा थडी येथे मोहरम ही मोठी यात्रा असून, या ठिकाणी अनेक जिल्ह्यातील व तेलंगानातील भाविक भक्त आणि अब्बास आली यांच्या वरती श्रद्धा ठेवून येत असतात. मोहरम,सना निमित्त हिप्परगा थडी येथे उपस्थित नव्याने रुजू झालेले, बिलोली पोलीस स्टेशन उपनिरीक्षक तिडके साहेब, व सगरोळी बीट जमादार कमलाकर साहेब,व शेख सर,व हिप्परगा थडी, येथील पोलीस पाटील शंकराप्पा मठपती,सरपंच इनामदार रहेबर, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिवसेना उबाठा कार्यकर्ते,सय्यद इरफान,इम्रान पटेल,वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष मुजाहिद सय्यद, व्यंकट तुकडे, बालाजी एडकेवार, साहेबराव एडकेवार,दीपक येडकेवार, व पोलीस टाइम्स प्रतिनिधी नांदेड जिल्हा मारोती एडकेवार,या सर्वांनी मिसळून हिप्पारगा थडी,येथे मोहरम ताजिया सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0