मौजे अटकळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उत्साहाचा जल्लोष. ( बिलोली प्रतिनिधी : गणेश कदम) मौजे अटकळी (ता. बिलोली) येथे दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता ध्वजारोहण सोहळ्याने कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. दुपारी 3 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे. संध्याकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शाहीर विश्वनाथ भालेराव व त्यांचा संच यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा सादर होणार असून, अण्णाभाऊंच्या विचारांची गाजवाज गावात रंगणार आहे. ही जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी होणार असून, ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमासाठी मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती राहणार असून, गावातील नागरिक, महिला मंडळ, युवक वर्ग तसेच सर्व समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आयोजक मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मौजे अटकळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उत्साहाचा जल्लोष.                                            
Previous Post Next Post