**मानवतरोड रेल्वे थांबा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे. ( मानवत / अनिल चव्हाण ) ९५२७३०३५५९-—————————————आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री तथा मा. अजितदादा पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे प्रवासी थांबा मिळवण्यासाठी विनंती केली.श्री साईबाबा जन्मभूमी पाथरी येथून जवळच असलेले मानवतरोड हे मानवत, पाथरी, सोनपेठ व माजलगाव या तालुक्यातील जवळचे रेल्वे स्टेशन आहे. पाथरी ही श्री साईबाबांची जन्मभूमी असून, दक्षिण भारतातून येणाऱ्या साई भक्तांसाठी मानवतरोड स्टेशन अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहेमानवतरोड रेल्वे स्टेशन हे मानवत पासून 6 किमी, पाथरी पासून 16 किमी, माजलगाव पासून 50 किमी आणि सोनपेठ पासून 40 किमी अंतरावर आहे. या परिसरातील बहुतांश विद्यार्थी व व्यापारी दररोज पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, नाशिक, मुंबई येथे ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे प्रवासी थांबा मिळणे ही लोकांची अत्यंत गरजेची मागणी आहे.या विषयाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तात्काळ केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णवजी यांना पत्र लिहून नांदेड-पुणे एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, पुणे- निजमाबाद एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस व सचखंड एक्सप्रेस इत्यादी गाड्यांना मानवत रोड येथे रेल्वे प्रवासी थांबा देण्यासाठी पुढाकार घेतला. ही केवळ मतदार संघाच्या सोयीची बाब नसून, आपल्या ९८ पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा नवा टप्पा आहे. यामुळे प्रवास सुलभ होईल, व्यापाराला चालना मिळेल, पर्यटनाला नवे आयाम मिळतील आणि स्थानिकांना नवी संधी उपलब्ध होईल. जनतेच्या हितासाठी घेतलेल्या या त्वरित निर्णया बद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांचे आमदार राजेश दादा विटेकर , सभापती पंकजराव आंबेगांवकर , डाॅ. अकूंशराव लाड यांच्या प्रयत्नाला यश आल्यामूळे त्यांनी यावेळी मनःपूर्वक आभार मानले.

*मानवतरोड रेल्वे थांबा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे.                                                             
Previous Post Next Post