हिप्पारगा थडी उपसरपंच पदी, सौ.चंद्रबाई व्यंकट तुकडे यांची बिनविरोध निवड. ( मारोती एडकेवार नांदेड/ज़िल्हा प्रतिनिधी )नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली दिनांक 13/ 8/ 2025 रोजी हिप्परगा थडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी, व ग्रामसेवक बी. आर.हंबीरे साहेब, व ग्रामपंचायत सरपंच इनामदार रहेबर यांच्या, अध्यक्षतेखाली सौ.चंद्रबाई व्यंकट तुकडे यांची सर्वानुमते, उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली, सन 2022 मध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हिप्परगा थडी येथील,सरपंच इनामदार रहेबर व त्यांच्या पॅनलचे सर्व सदस्य निवडून आले.त्यात जानेवारी 2022 रोजी मारुती एडकेवार यांना उपसरपंच पदी निवड करण्यात आली. परंतु मारोती एडकेवार यांनी दोन वर्षाच्या नंतर काही, खाजगी कारणास्तव आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच इनामदार रहेबर यांच्याकडे दिला, होता उपसरपंच पद हे रिकामी झाले होते. त्यामुळे सरपंच च्या अनुपस्थितीमध्ये गावचा कारभार चालवणे कठीण जात असल्यामुळे,आज दिनांक 13/ 8 /2025 रोजी शासनाच्या नोटीस आदीं राहून,ग्रामसेवक, बी. आर. हंबीरे व सरपंच इनामदार रहेबर यांनी, त्यांच्या अध्यक्षतेखाली. सौ चंद्राबाई व्यंकट तुकडे यांची, सर्वानुमते उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली, या निवडीमुळे उपसरपंच सौ.चंद्राबाई व्यंकट तुकडे, यांचे प्रतिनिधी व्यंकट हणमंत तुकडे, व गावातील सर्व सदस्य, व तुकडे परिवारात आनंदाचे वातावरण असून, सौ.चंद्राबाई तुकडे यांनी दिलेली जिम्मेदारी पूर्णपणे, व यशस्वीरित्या इमानदारीने पार पाडणार, अशी आश्वासन दिले.
byMEDIA POLICE TIME
-
0