जि . प . मराठी शाळा व जि . प . उर्दू शाळा तसेच अ .ध . चौधरी महाविद्यालय ग्रामपंचायत स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. (यावल प्रतिनिधी( रविंद्र आढाळे)तालुक्यातील डोंगर कठोरा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते व विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.यात जिल्हा परिषद मराठी शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान तडवी यांच्या हस्ते तर जि प उर्दू शाळा . अ ध चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज व महिला विद्यालय येथील ध्वजारोहण अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ राजेंद्रकुमार झांबरे यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत,ध्वजगीत,महाराष्ट्र गीत सादरीकरणासह तंबाखू व सिगारेट मुक्त परिसर ठेवण्याबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.तसेच लेझीम कवायत व परेड द्वारे राष्ट्रीय ध्वजास सामूहिक सलामी देण्यात आलीयावेळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी गजानन पाटील,ग्राम पंचायत अधिकारी ए टी बगाडे,समुदाय आरोग्य अधिकारी हर्षल चौधरी,केंद्र प्रमुख महंमद तडवी,अशिप्र मंडळ अध्यक्ष डॉ राजेंद्रकुमार झांबरे,संचालक ,मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्राचार्य डी जी भोळे,एस बी ढाके, विनोद मोरे,विजय वाकेकर,रवींद्र खरे,एन व्ही वळींकर,रामेश्वर जाणकर,नयना पाटील,आर पी चिमणकारे,पी पी कुयटे,विवेक कुलट,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे,सोनाली फेगडे,चेतन चौधरी, सचिन भंगाळे,अरविंद कुरकुरे,ठकसेन राणे,योगेश राणे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,कल्पना राणे,आशा आढाळे,कल्पना पाटील,ऐश्वर्या कोलते,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,मराठी शाळा मुख्याध्यापिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,ज्योती भादले,मोहिनी पाटील,आरोग्य सेवक चेतन कुरकुरे,आरोग्य सेविका लता चौधरी,ग्रामस्थ ,डिगंबर खडसे,प्रदीप पाटील,गणेश झोपे,पवन राणे,विजय आढाळे यांच्यासह अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,वीज कर्मचारी विविध सरकारी व सहकारी संस्था अधिकारी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0