स्मार्ट मीटर बसवण्यास सगरोळी ग्रामस्थांचा विरोध, 16 पथकातील 200 कर्मचाऱ्यांना पीटाळले. (मारोती एडकेवार नांदेड /ज़िल्हा प्रतिनिधी )नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे,सगरोळी गावात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी व दुरुस्तीसाठी, लातूर धाराशिव बीड येथील 200 कर्मचारी गावात येऊन, दशत माजवल्याचे काम करत,असल्यामुळे गावातील नागरिकांनी, काही प्रश्न विचारल्यावर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थ नंतर संबंधित, पथकास गावातून बाहेर काढण्यात आले. सदर घटना मंगळवारी दुपारी विद्युत विभागाचे अधिकारी,व गावकरी यांची व्यापक बैठक झाली. त्या बैठकीत नवीन स्मार्ट मीटरवर संशय व्यक्त करण्यात आला. अंदाजे बिल टाकून, अवघ्या ते सव्याची, वसुली चालू आहे.सदरील मीटरची रीडिंग जास्त येत आहे, यामुळे ग्रामपंचायत येथे सीसीटीव्हीच्या नजरेत दोन मीटर डेमो म्हणून बसवण्यात आले, असताना नवीन मीटर बसवण्याचे परिपत्रक दाखवल्यानंतर, मीटर सुरळीत चालू देण्याचे ठरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी, लातूर,धाराशिव बीड,येथील 16 क्लोजर, बुलेरो गाड्यांचे,पथक 200 कर्मचारी गावात येऊन दशक माजवण्याचे काम करत होते, या असल्यामुळे गावातील जागरूक नागरिकांनी काही प्रश्न विचारल्यावर, सर्व पत्रके गावातून पळ काढले, व एक पथकास गावकरी रोखून ठेवल्यामुळे,पोलीस प्रशासनाच्या मध्ये नंतर संबंधित पथकास बाहेर काढण्यात आले. सगरोळी गावकरी यांच्या भावना एकवट आहेत,नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये,आल्यास पुढील काळातील,आंदोलन करण्यात येईल,विद्युत विभाग असेच दहशत पसरल्यास सगरोळी गावात,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, ही जबाबदारी विद्युत विभागाची असेल अशी प्रतिक्रिया, सगरोळी ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0