समाज गौरव राष्ट्रीय पुरस्काराने लताताई बाविस्कर सन्मानित. (नवी दिल्ली )– साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव केंद्रीय समितीच्या वतीने दिला जाणारा समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार यंदा जळगाव येथील भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. लताताई बाविस्कर यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे ५ ऑगस्ट २०२५ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्या, लोकसभेचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, राज्यसभेचे खासदार अनिल बोन्डे, माजी आमदार राम गुंडूळे, सुभाष दाजी पवार आदी मान्यवर देखील व्यासपीठावर उपस्थित होते.लताताई यांच्या कार्यशक्तीचा आलेख केवळ पक्षीय मर्यादेत न राहता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या एक कणखर महिला नेतृत्व म्हणून उभा राहिलेला आहे. गेल्या ९-१० वर्षांपासून त्या सामाजिक चळवळीत सक्रिय असून त्यांनी अनुसूचित जाती व वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी विविध आंदोलने, जनजागृती मोहीमा, आणि संघटनात्मक उपक्रम राबवलेले आहेत. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य व सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखील त्या कार्यरत असतात. त्यांचे सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांना समाज गौरव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

समाज गौरव राष्ट्रीय पुरस्काराने लताताई बाविस्कर सन्मानित.                                                                                
Previous Post Next Post