*विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत विविध कौशल विकसित करावेत.**@)> डॉ. श्रीनिवास के. शेट्टी.*. (मानवत / वार्ताहर )दिनांक ११ आगष्ट रोजीके. के. एम महाविद्यालयात बी.ए,बी.एस्सी, बी.कॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालया मध्ये *दिक्षांत समारंभ* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास के. शेट्टी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के.जी. हुगे डॉ.कैलास बोरुडे, डॉ. पंडित लांडगे, डॉ. सत्यनारायण राठी, उपस्थित होते यावेळी डॉ.श्रीनिवास के शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये विविध कौशल्य विकसित करून सर्वांगीण विकास घडवून आणवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या वाढीच्या सर्व पैलूंचा, जसे की शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक, संतुलित विकास होय. व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या व्यक्ती च्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी प्रक्रिया. यात विचार, भावना, आणि वर्तनांचा समावेश होतो. हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्या मध्ये व्यक्ती स्वतःला ओळखते, सुधारते आणि सामाजिक जीवनात प्रभावीपणे वावरण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करते. असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.भास्कर मुंडे म्हणाले की महाविद्यालयीन जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय क्रीडांगण इतर सर्व सुख सुविधांचा पुरेपूर वापर करून आपला सर्वांगीण विकास घडवून आणावा. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास बोरुडे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. सत्यनारायण राठी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत विविध कौशल विकसित करावेत.**@)> डॉ. श्रीनिवास के. शेट्टी.*.                                  
Previous Post Next Post