आदिवासी विकास विभाग तर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची जय्यत तयारी. (यावल दि.७ ( सुरेश पाटील ) जिल्हास्तरीय असलेल्या यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट २०२५ हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या वर्षीही सदर कार्यक्रम दि.९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २ वाजेपर्यंत पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि. जळगाव, चोपडा रोड,सार्वजनिक बांधकाम विभाग आवार येथे शासकीय कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०:०० वा. प्रकल्प कार्यालय येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.आदिवासी दिनानिमित्ताने अनेक सामाजिक संस्थांकडून मिरवणूक व जिवंत तसेच चित्ररुपी देखावे सादरीकरण करण्यात येणार आहे.तसेच राणी दुर्गावती ( ५ ऑक्टोबर, १५२४- २४ जून १५६४ ) सोळाव्या शतकातील गोंडवाना ( गडामंडला ) साम्राज्याची कर्तृत्ववान व पराक्रमी राणी.त्यांचा जन्म चंदेलवंशीय महोबा येथील राजपूत घराण्यातला. दुर्गावतींना तीरकमठा,तलवारबाजी, घोडेस्वारी,नेमबाजी,गोळाफेक, भालाफेक इत्यादी शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले.त्याचबरोबर त्यांनी संस्कृत - शास्त्र,समाजशास्त्र,धर्मशास्त्र इत्यादीविषयांचा अभ्यास होता.राणी दुर्गावती यांना त्यांच्या शौर्य,धैर्य आणि कुशल राज्यकारभारासाठी ओळखले जाते.त्यांनी गोंडवाना राज्याचे मुघलांपासून संरक्षण केले.यात राणी दुर्गावती जखमी झाल्या.त्यांनी शत्रुच्याहातून मृत्यू न पत्करता पोटात खंजीर खुपसून वीरांगनेचे मरण पत्करले. त्यामुळे ते एक महान योद्धाआणि शासक म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.सन १९८३ मध्ये मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या स्मरणार्थ जबलपुर विद्यापीठाचे नाव बदलूनराणी दुर्गावती विद्यापीठ असे केले आहे.तसेच सन २४ जून, १९८८ रोजी भारत सरकारने या शूर राणीच्याहुतात्म्याची आठवण म्हणून एक टपाल तिकीट जारी करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.विरांगणा राणी दुर्गावती यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर विरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण वसक्षमीकरण मेळावाचे मा.ना.देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते कविवर्य सुरेश भट सभागृह,रेशिमबाग,नागपुर येथे शनिवार दि.९ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वा. उद्घाटन होणार आहे.सदरील उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावल येथे कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी महिलांनी याचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आव्हाहन प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी,लोकप्रतिनिधी,आदिवासी सेवक,आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शासकीय अधिकारी, शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातीलविद्यार्थी / विद्यार्थीनी, पंचक्रोशीतील आदिवासी बंधू-भगिनी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे जाहिर आवाहन यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0