**मानवत नगर परिषदेच्या वतीने तिरंगा स्वाक्षरी मोहिमेत कर्मचार्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*. (मानवत / वार्ताहर.)तिरंगा स्वाक्षरी मोहिमेत मानवत शहरातील नागरिकांचा देशभक्तीचा संकल्प*हर घर तिरंगा* मोहिमेत मानवत नगर परिषदेसह मानवतकरांचा उत्स्फूर्त सहभाग*भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा* उपक्रमाला चालना देण्यासाठी मानवत नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद प्रांगणात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. यासाठी विशेष फलक उभारण्यात आला. ज्यावर मानवत नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वाक्षऱ्या केल्या.तर ही मोहीम मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. स्वाक्षरी मोहिमे दरम्यान मानवत नगर परिषदचे बांधकाम अभियंता सय्यद अनवर, नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्वाक्षरी करून "१५ ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवूया" या संकल्पनेला पाठिंबा दिला.या उपक्रमाचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या संकल्पनेला बळकटी देणे हा होता. मानवत नगर परिषद अधिकाऱ्यांनी सांगितले की, हर घर तिरंगा हा केवळ एक कार्यक्रम नसून आपल्या स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाची आठवण करून देणारा आणि एकतेचा संदेश पसरवणारा उपक्रम आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवत नगर परिषदेतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. फलकावरील स्वाक्षऱ्यांनी तिरंग्याबद्दलचा आदर आणि अभिमान स्पष्टपणे जाणवला.***
byMEDIA POLICE TIME
-
0