***मानवत शहरा मधून मक्का मदिना यात्रेसाठी दोन भाविक रवाना.*. वार्ताहर / मानवत——————————————. उमराह यात्रेसाठी मानवत शहरा मधून दोन भाविक रवाना झाले या मध्ये मानवत नगर परिषदेचेमाजी नगरसेवक सय्यद जमील यांची आई व भाऊ मक्का- मदीना यात्रेला प्रस्थानमानवत शहरातील तल्लाब कट्टा परिसरातील मानवत नगर परिषदेचे माजी नगरसेवक सय्यद जमील यांची आई व लहान भाऊ सय्यद अरशद हे पवित्र उमराह यात्रा करण्यासाठी रवाना झाले आहेत. रविवारी माजलगाव येथून नातेवाईकांसह मुंबईमार्गे मक्का-मदीना या पवित्र स्थळांकडे त्यांनी प्रयाण केले.प्रवासाच्या वेळी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सुखरूप प्रवासा साठी व उमराह यात्रा निर्विघ्न पूर्ण होण्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनासय्यद जमील यांनी सांगितले की, “या पवित्र यात्रेची कुटुंबाला अनेक वर्षांची इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे, हे आमच्या साठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.” भाविकतेने भारलेल्या वातावरणात निरोप समारंभ पार पडला. यावेळी सय्यद जमील भाई यांचे जिवलग आनंद मामा भदर्गे, पत्रकार मुस्तकीन बेलदार , पत्रकार इरफान बागवान, बेलदार, आसेफ खान, अफसर अन्सारी, जावेद मिलन, नजाद पठाण, मोहम्मद मुस्ताक,शगिर खान,सय्यद आरेफ शेख परवेज आदी मान्यवर उपस्थित होते.**

मानवत शहरा मधून मक्का मदिना यात्रेसाठी दोन भाविक रवाना.*.                                                                      
Previous Post Next Post