मोठा *बडाकब्रस्तानातील विकासकामांना गती !**@}- अंकुशराव लाड*. (मानवत / बातमीदार).——————————————मानवत शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील बडा (मोठ्या ) कब्रस्तान परिसरात अनेक वर्षां पासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता या भागातील चिखलमय रस्ते, तुटलेला पूल, स्वच्छता गृहाची कमतरता आणि वयोवृद्ध मुस्लिम नागरिक नमाजींसाठी बसण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.या विषयी काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी या सामान्य नागरी समस्या डाॅ. अंकुशराव लाड यांच्याकडे मांडल्या. त्यात नवीन पूल उभारणी, स्वच्छतागृह उभारणी, वयोवृद्ध नमाजींसाठी सिमेंटचे टेबल, रस्त्याचे डांबरीकरण व परिसराची स्वच्छता यांचा समावेश होता. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेअन डाॅ. अंकुशराव लाड यांनी या परिसराची स्वतः पाहणी करून या भागातील विकास कामांना तात्काळ सुरुवात केली.सध्या या विकास कामाने वेग घेतला असून, रस्ता दुरुस्ती व पूल उभारणीचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे. यामुळे नमाजीसाठी येणाऱ्या नागरिकांना आता तारेवरची कसरत करावी लागणार नाही.डाॅ. अंकुशराव लाड यांनी मुस्लिम बांधवांना दिलेल्या आश्वासनानुसार या भागातील विकास कामे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी आणि बडा (मोठा) कब्रस्तान कमिटी यांच्या वतीने डाॅ. अकूंशराव लाड त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या कामांच्या पूर्णत्वानंतर नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मार्गासह स्वच्छ परिसर व आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत या परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.***
byमीडीया पोलीस टाईम LIVE
-
0

