नांदेडमध्ये मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळा
वंचित बहुजन आघाडी कडून मंडळ आयोग दिवस साजरा
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : वंचित बहुजन आघाडी, नांदेडच्या वतीने मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मंडल आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सामाजिक न्यायाच्या या लढ्याला पुढे नेण्यासाठी अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी OBC आरक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांच्या प्रश्नावर सातत्याने ठाम भूमिका घेतली आहे. मंडल आयोगाच्या शिफारशींचे संरक्षण आणि OBC समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव रवी पंडित, जिल्हा नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, उपाध्यक्ष गणपत सोनकांबळे, उपाध्यक्ष विद्यानंद पवळ कांबळे, जिल्हा संघटक संजय ठीके, जिल्हा सल्लागार जयपाल ढवळे, गौतम डुमणे तसेच शुक्लोदन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक न्याय, समान संधी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मंडल आयोग हा सामाजिक न्यायाच्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा असून, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवू,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जय भीम! जय फुले! जय मंडल!

