शालेय जिल्हा टेबल टेनिस व सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी )क्रीडा विकास साठी सर्वांनी संघटीत व्हावे: डॉ संजय रोडगेसेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ऑक्टोबर रोजी नूतन विद्यालय इनडोअर क्रीडा हॉल मध्ये शालेय जिल्हा टेबल टेनिस व सेलू तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ संजय रोडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, प्रमुख पाहुणे संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल ,सय्यद साजीद, जिल्हा सचिव गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.डॉ संजय रोडगे म्हणाले सेलू तालुक्यातील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी सर्व संस्था चालकांनी एकञ येऊन प्रयत्न केला तर गुणवत्ता नक्कीच वाढेल, सेलूत क्रीडा सुविधा नूतन शिक्षण संस्था व श्रीराम प्रतिष्ठान, सेलू तालुका क्रीडा संकुल येथे अद्ययावत क्रीडांगण व इनडोअर क्रीडा हॉल उभारण्यात आले आहेत.शालेय जिल्हा ग्रामीण टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत १४/१७/१९ वर्षे आतील मुले मुली एकुण २२ संघांतील ११० खेळाडू सेलू, गंगाखेड, पुर्णा, तालुक्यातील सहभाग नोंदवला.स्पर्धेत पंच म्हणून चेतन मुक्तावार, संजय भुमकर, किशोर ढोके,अनुराग आंबटी, कुणाला चव्हाण, प्रा. सत्यम बुरकुले, सुरज शिंदे, जुलाह खुदुस, यांनी काम पाहिले.शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:-१४ वर्षे मुले: नूतन विद्यालय सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)१४ वर्षे मुली:- नूतन कन्या प्रशाला सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), १७ वर्षे मुले: नूतन विद्यालय सेलू (प्रथम), बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), बा.बि.नूतन इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)१७ वर्षे मुली:- बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), नूतन विद्यालय सेलू (तृतीय) १९ वर्षे मुले: जनबाई कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड, (प्रथम) नूतन महाविद्यालय सेलू (व्दितीय), १९ वर्षे मुली: जनाबाई कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड (प्रथम).सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा साठी तालुक्यातील 21 शाळेचा सहभागी झाल्या होत्या.अंतिम निकाल पुढील प्रमाणे 14 मुले गटात :- नूतन विद्यालय (प्रथम), व्हिजन इंग्लिश सेलू (व्दितीय) बोर्डीकर पोदार इंग्लिश सेलू(तृतीय).14 मुली : नूतन विद्यालय(प्रथम) व्हिजन इंग्लिश सेलू (प्रथम) बोर्डीकर पोदार इंग्लिश सेलू(व्दितीय).उत्कर्ष विद्यालय सेलू (तृतीय)17 मुले :- प्रिन्स इंग्लिश सेलू (प्रथम), व्हिजन इंग्लिश सेलू (व्दितीय), नूतन विद्यालय सेलू (तृतीय)17 मुली :-व्हिजन इंग्लिश सेलू (प्रथम), नूतन विद्यालय सेलू (व्दितीय), बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)19वर्ष वयो गटात मुले :- नूतन महाविद्यालय सेलू.पंच :- विक्रम गुट्टे, अनुराग आंबटी, जुलाह खुदुस आदी.

शालेय जिल्हा टेबल टेनिस व सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न.                                                         
Previous Post Next Post