दिनांक.9/1/2026 पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने वाँश आउट मोहीम राबवित असतांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मांडगाव कडुन वाघोली कडे एक ट्रॅक्टर अवैधरित्या विना परवानगीने काळया रेतीची अवैदयरित्या चोरी करून ट्रॅक्टर मध्ये भरून वाहतुक करणार आहे,, अशी मुखबीरकडून खात्रीषीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार हे खाजगी वाहनाने रवाना होवून सास्ताबाद ते वाघोली रोडवर वाहने सुरक्षीत रोडचे बाजुला उभे करून नांकाबदी करीत असताना एक लाल रंगाची ट्रक्टर येताना दिसल्याने ट्रक्टर चालकांस थाबवून चालकास त्याचे नाव, पत्ता विचारला असता विना ट्रॅक्टर क्रमांकचा चालक याने त्याचे नाव नामे गणेष सुनिल डांगरी वय 31 वर्श रा.मांडगांव ता.समुद्रपुर असे सांगितले. ट्रॅक्टर व ट्रॉलीची पंचासमक्ष पाहनी केली असता 1) एक नवीन महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रक्टर ज्यास आरटीओ नोंदणी क्रमांक नसलेला असून किं. 4,00,000 व विना क्रमांकाची ट्राली किंमत 1,00,000रू व ट्राँलीमध्ये भरून असलेली एक ब्राँस रेती (100 फुट) गौण खनिज ओली रेती किं. 5,000रू असा जु कि.5,05,000 रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीस ताब्यात घेवून पोस्टे ला परत येवून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेव सा., मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. रोहीत साठे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0