सावदा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी, जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक,,,,, (जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी- विनोद हरी कोळी) सावदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/2025, भारतीय न्याय संहीता कलम 309(4) प्रमाणे दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सर SDPO श्री सुभाष ढवळे सर यांच्या मार्गदर्शनात कमीत कमी वेळेत कुठलीही उपयुक्त माहिती नसताना गोपनीय बातमीच्या आधारे आरोपीताचा छडा लावून दोन आरोपींना 1) अब्बास इबाबत शेख इराणी 2) मोहम्मद अली उर्फ पद्दू काला अली इराणी अश्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला 1,32,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करून गुन्हाची उकल केली तसेच सदर आरोपीतांना कडून मलकापूर येथून चोरलेली मोटर सायकल हस्तगत करून मलकापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा देखील उघडकीस आणला म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल पाटील, पोलीस हवालदार संजीव एकनाथ चौधरी, निलेश बाविस्कर व मयूर पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0