*रावेर महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता व वृक्षारोपण*. (महाराष्ट्र संपादिका सानिया तडवी)रावेर येथे श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणीव जागवणाऱ्या उपक्रमांसह साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. एस. के. महाजन यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी दोन थोर नेत्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन व सहाय्यक अधिकारी प्रा. एल. एम. वळवी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.महात्मा गांधींच्या "स्वच्छता हीच सेवा" या विचारांवर आधारित उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता केली. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. एम. वळवी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी गांधीजींच्या सत्य, प्रेम व अहिंसा, तत्त्वज्ञानाचे पालन करून आनंदी व चांगले सुखी जीवन जगण्यासाठी प्रत्येक माणसाने आचरणात आणावे. जन सेवा हीच ईश्वर सेवा मानून समाज सेवा करावी. स्वच्छता यावरील विचारांवर प्रकाश टाकला. तर शास्त्रीजींच्या "जय जवान, जय किसान" या घोषणेचे महत्व पटवून देत तरुणांना शिस्त, देशप्रेम व प्रामाणिकपणाचे धडे दिले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या विचारांवर आधारित घोषवाक्ये दिली व परिसरात स्वच्छता जनजागृती फेरीही काढली. वृक्षारोपणानंतर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन NSS स्वयंसेवकांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सागर महाजन यांनी केले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

*रावेर महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता व वृक्षारोपण*.                                
Previous Post Next Post