रावेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 11 मधून सिद्धार्थ ठाकणे यांच्या नावाची जोरदार चर्चा .. (रावेर (प्रतिनिधी) आगामी रावेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून रावेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 मधून तरुण व उत्साही व्यक्तिमत्व सिद्धार्थ संजय ठाकणे यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.सामाजिक कार्यात सक्रिय असलेले, वेळोवेळी गोर गरिबांना मदत करणारे, जनतेच्या सुख दुःखात सदैव उपस्थित राहणारे असे सिद्धार्थ ठिकाणे हे तरुणांमध्ये लोकप्रिय असून, त्यांनी गेल्या काही वर्षांपासून परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने वेळोवेळी आवाज उठवला आहे. विकासकामांबाबत तत्परता, लोकसंपर्क आणि सेवाभाव या गुणांमुळे त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे.आणि ते युवक असल्याने नवयुकांमधून ते प्रभागात आघाडी घेतांना दिसून येत आहे.स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, “तरुण नेतृत्वाची वेळ आली असून, सिद्धार्थ ठाकणे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे प्रभागाचा विकासास अधिक गती घेईल.”येत्या काही दिवसांत सिद्धार्थ ठाकणे उमेदवारी जाहीर करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0