नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात बातमी निवेदक स्पर्धेचे आयोजन ... (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार)नंदुरबार: तळोदा - शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बातमी निवेदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून दिव्य मराठीचे वृत्तपत्राचे पत्रकार कालीचरण सूर्यवंशी व दैनिक सकाळचे पत्रकार सम्राट महाजन होते प्रसंगी प्रमुख मान्यवर श्रीमती मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल व मुख्या. गणेश बेलेकर सर होते. स्पर्धेत एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यात योगिनी परदेशी व लावण्या बोरसे अनुक्रमे प्रथम तर अमृता करांडे दर्पण पावरा अनुक्रमे द्वितीय घोषित करण्यात आले परीक्षक सूर्यवंशी सर यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थांना पेन भेट देत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिरातील शिक्षक अरुण कुवर सागर मराठे कमलेश पाटील अश्विनी भोपे प्रतिभा गुरव अंकित डोंगरे शैलेंद्र पाटील ईश्वर चित्रकथे समाधान मराठे गणेश पाडवी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0