सानूग्रह अनूदान वितरणाचा ऐतिहासिक शूभारंभ ============. (मंगरुळपीर ---दि ६(वार्ताहर):- सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी अल्प दरात सरळ खरेदीने जमिनी संपादित करून शेतकर्यांवर अन्याय झाला त्या विदर्भातील शेतकर्यांना ८३२ कोटींचे सानूग्रह अनूदान शासनाने मंजूर केले, वाशीम जिल्ह्यातील २१९१.१९ हे. आर. जमीन ला ११० कोटी रुपये चा लाभ २२०० कुटुंबातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना मिळत आहे. त्या अनूदानाचे वाटप शूभारंभ आमदार सईताई डहाके यांच्या अध्यक्षते खाली बाबुसिंगजी महाराज धर्मगुरू तथा आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि ६ रोजी,कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे थाटात संपन्न झाला, यावेळी धर्मगुरू तथा आमदार,महंत बाबुसिंगजी महाराज, आमदार श्रीमती सईताई डहाके, आमदार श्यामभाऊ खोडे , माजी आमदार विजयराव जाधवमाजी आमदार श्रीकांत देशपांडे भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे, रवी पाटील घुले, संचालक कृ.उ.बा.स.विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष माणिकराव गंगावणे गूरूजी, शिवदास पाटील ताठे,बाबुसिंगजी पवार इत्यादींची उपस्थिती होती,विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समितीच्या संघर्षाला यश येऊन महाराष्ट्र शासनाने ८३२ कोटी रूपयांचे सानूग्रह अनूदान मंजूर केले त्या अनूदानातील वाशीम जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अनूदान वितरणाचा शूभारंभ आज दि,६ ऑक्टोबर २०२५ रोजी, आमदार सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गूरूजी यांनी केले,आणि प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना वरील मान्यवरांच्या हस्ते प्राथिनीधीक स्वरूपात काही शेतकऱ्यांना सानूग्रह अनूदानाचे धनादेश वाटप करण्यात आले,त्यामध्ये कारंजा तालुक्यातील अनिताताई राजेन्द्र भगत, गोपाल राजाराम सातपुते, मंगरुळपीर तालुक्यातील मो. नाजीम अ. गफ्फार,निलेश दिलीप पवार, तर वारा ज. प्रकल्पातील बोरी येथील सौ. चंद्रभागा भाऊराव मापारी, कुंडलीक विठोबा मापारी, निंबाजी विठोबा मापारी, पांगराबंदी येथील गजानन मोतीराम इंगळे, सदानंद शिवशंकर घुले, गजानन त्र्यंबक निंबोकार, मानोरा तालुक्यातील मंजुळा सुखदेव उघडे, दशरथ थावरा राठोड यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश चे वितरण करण्यात आले. यावेळी माणिकराव गंगावणे गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाशीम जिल्हा व विदर्भातील पदाधिकारी यांचा संघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वाशीम जिल्ह्यातील हजारो च्या संख्येने प्रकल्पग्रस्त बंधू, भगिनी तथा अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील समिती पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय भरदुक,राधेशाम शिरसाठ,अशोकराव मगर, गणेश रहाटे,शिवाजी घुगे,महादेव निंबोकार,मुखतार पटेल,देविदास गंगावणे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप जोशी तर आभार शंकर शिंदे सर यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0