नविन शाखेचे लोकार्पण सोहळा वरोरा तालूक्यातील माढेळी येथे मोठ्या ऊत्साहात साजरा .... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.8:- वणा नागरीक सहकारी बँक लि. हिंगणघाट यांच्या नवीन शाखेचे लोकार्पण सोहळा वरोरा तालुक्यातील माढेळी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या नविन शाखेचे उद्घाटन चंद्रपूर लोकसभा क्षेत्र खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी केले तथा अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभा आमदार श्री करणजी देवतळे होते. प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा आमदार मा. समीरजी कुणावार, माजी राज्यमंत्री मा. रणजीतदादा कांबळे, हिंगणघाट विधानसभा माजी आमदार मा. राजूभाऊ तिमांडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे, जि.प. चंद्रपूर माजी बांधकाम सभापती मा. प्रकाशबाबुजी मुथा, माढेळी सरपंच श्री देवानंदजी महाजन, भद्रावती कृ.उ. बा.सभापती राजेंद्र डोगे,वरोरा कृ.उ.बा. समीती संचालीका सौ. कल्पनाताई टोंगे, भद्रावती नगर परीषद माजी उपाध्यक्ष श्री संतोषजी आमणे,भद्रावती तालुका नागरी सहकारी संस्था भद्रावती संचालक संजय उमरे तसेच अनेक मान्यवर उपस्थीत होते.वणा नागरीक सहकारी बँक लि. हिंगणघाट बँकेचे अध्यक्ष ॲड. सुधीरजी कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली माढेळी शाखेची सुरुवात करण्यात आली.

नविन शाखेचे लोकार्पण सोहळा वरोरा तालूक्यातील माढेळी येथे मोठ्या ऊत्साहात साजरा ....                                  
Previous Post Next Post